Random Video

Latest Bollywood Update | Madhuri Dixit आणि समुराय, एक अनोखी अदा | Lokmat Marathi News

2021-09-13 29 Dailymotion

आपल्या स्मित हास्याने चाहत्यांवर मोहिनी घालणारी बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने एक वेगळा अवतार धारण केला आहे. माधुरीने चक्क एका जपानी सामुराय योद्ध्याचा वेष धारण केला आहे. माधुरीने स्वतः आपल्या ट्विटर हॅन्डलवरून हा फोटो शेअर केला आहे.या वेशभूषेमध्ये माधुरीच्या चेहऱ्यावरील भावही योद्ध्याप्रमाणे दिसत आहे. माधुरीने या फोटो सोबत जगभरातील सर्व योद्ध्यांना एक संदेश देत सलामी दिली आहे. माधुरीने संदेशात म्हटले आहे की, ‘आज मी सामुराय मुकूट आणि तलवार हातात घेऊन पाहिली. जगभरातील योद्ध्यांना असाच पेहराव करून घोडस्वारी करत लढाईला जावे लागते. या सर्व योद्ध्यांच्या शौर्याला आणि सामर्थ्याला मी सलाम करते.’

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews